चीनी डुप्लीकेट उत्पादनांची मोहमयी दुनिया

duplicate
चीन आज जगातील दोन नंबरची अर्थव्यवस्था म्हणून पुढे आला आहे. त्यात त्यांच्या प्रचंड उत्पादन क्षेत्राचे योगदान निःसंशय मोठे आहे. असे असले तरी जगभरात चीनमध्ये लोकप्रिय ब्रँडची डुप्लीकेट उत्पादनेही मोठ्या प्रमाणावर तयार होतात आणि चीनमधले हे मार्केटही आकाराने प्रचंड आहे. जगातील कोणताही लोकप्रिय ब्रँड चीनमध्ये नक्कल केला जातो हे स्पष्टपणे सामोरे येत आहे.

अॅपल आयफोनचे डुप्लीकेट स्टोअर चीनमध्ये नुकतेच उघडकीस आले असतानाच आता अमेरिकी बँक गोल्डमन सॅक्सच्या शाखेची चिनी आवृत्तीही नुकतीच प्रकाशात आली आहे. स्पेलिंगमध्ये थोडाफार बदल करून ब्रँडेड उत्पादनांची नक्कल येथे केली जाते आणि स्पेलिंग चुकीचे आहे असे न सांगता चिनी भाषेत असेच स्पेलिंग केले जाते असे ठणकावून सांगत ही डुप्लीकेट उत्पादने बाजारात सर्रास मूळ उत्पादनांच्या किमतीपेक्षा खूपच कमी किमतीत विकली जातात.

उदाहरण द्यायचे झाले तर गुगलचे प्ले स्टेशन लहानग्यांसाठी खरेदी करणे कदाचित पालकांना थोडे महाग वाटत असेल पण त्याचजागी प्ले स्टेशनऐवजी पॉली स्टेशन हे डुप्लीकेट चिनी उत्पादन सहज परवडणार्‍या किमतीत मिळते. अमेरिकेतील लोकप्रिय फूड चेन केएफसी, र्मकडोनाल्ड या कंपन्यांच्याही अशाच स्पेलिंग बदलून सुरू असलेल्या शाखा जोरात सुरू आहेत तीच बाब नायके, अदिदास, पिझ्झा हट, ब्लॅक लेबल व्हिस्की, ओले शांपू, कोलगेट, स्टार बक्स अशा अनेक नामवंत उत्पादन कंपन्यांच्या बाबतीतही केली गेली आहे. वरून ही उत्पादने इतकी ओरिजिनल दिसतात की स्पेलिंगमधील हा छोटासा बदल लक्षातही येत नाही. परिणामी हे डुप्लीकेट मार्केटही जोरात बहरात आहे आणि चीनची अर्थव्यवस्था सुधारण्यास मोठा हातभारही लावते आहे.

Leave a Comment