आस्ट्रेलियाच्या मेंढीने दिली ४० किलो लोकर; तोडले सर्व रेकॉर्ड

sheep
सिडनी- सर्व रेकॉर्ड तोडून ४० किलो लोकर ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका रानमेंढीने दिली आहे. अनेक वर्षापासून जंगलात राहणाऱ्या मेंढीच्या अंगावर खूप लोकर निर्माण झाली होती परंतु तिच्याकडे कुणाचे लक्ष नसल्यामुळे ती लोकर अंगावर घेऊनच तिला फिरावे लागत असे.

जेव्हा ही बाब प्राणी रक्षण आणि कल्याण समितीच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी आरएसपीसीएला बोलवले आणि तिच्या अंगावर लोकर काढायला सांगितली. आरएसपीसीएने हे काम करण्यासाठी लोकर काढण्यातील नॅशनल चॅम्पियन आयन एलकिनला बोलावले. त्यांनी तिच्या अंगावरील लोकर अत्यंत सफाईने काढली. जेव्हा तिच्या अंगावरील लोकर काढली गेली तेव्हा ती मेंढी तिच्या छोट्याशा अंगकाठीमध्ये आरामशीर उभी होती. गेल्या ३५ वर्षांमध्ये मी एवढे आव्हानात्मक काम केले नव्हते असे एलकिनने म्हटले आहे.

Leave a Comment