ट्विटरच्या सीईओच्या शर्यतीत भारतीय ‘पद्मश्री’

padamshree
नवी दिल्ली : ट्विटरच्या सीईओपदाच्या शर्यतीत पद्मश्री वॉरियर या असून आंध्र प्रदेशातील विजयवाड्याच्या येल्लेपेडीतील पद्मश्री वॉरियर या आहेत. तीन महत्त्वाच्या पदांसाठी ट्विटर शोध घेत आहे, कंपनीचे नेतृत्त्व करण्यासाठी पद्मश्री वॉरियर यांनी निवड केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्विटरच्या सीईओपदाचा डिक कॅस्टोलो यांनी राजीनामा दिला असून सध्या सीईओपदाचा प्रभार जॅक डोर्सी हे सांभाळत असल्यामुळे ट्विटरने आता सीईओपदासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. सीबीएस इंटरअक्टिव्हचे जीम लॅन्झोन हेही ट्विटरच्या सीईओपदाच्या शर्यतीत आहेत.

Leave a Comment