जिओनीचा फॅशन सिरीजमधला एफ १०३ आला

gionee
स्मार्टफोन उत्पादक कंपनी जिओनीने तयांचा फॅशन सिरीजमधला एफ १०३ स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरविला असून या फोनला श्याओमीच्या रेडमी ४जी, लेनेवोच्या के ३, मोटोरोलाच्या मोटो जी थर्ड जन. यांना टक्कर द्यावी लागणार आहे. हा फोन कंपनीने ९९९९ रूपयांत विक्रसाठी उपलब्ध करून दिला आहे.

या फोनसाठी ग्लास बॅक पॅनल, मेटल फ्रेम, ड्युल सिम व ड्युल स्टॅडबाय सपोर्ट करणारा आहे. ड्रॅगनट्रेल ग्लास प्रोटेक्शनसह ५ इंची एचडी डिस्प्ले, अँड्राईड लॉलिपॉप ५.० ओएस, त्यात अमिगो ३.० स्क्रीनचा वापर,२ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी, कार्डच्या सहाय्याने ३२ पर्यंत वाढविण्याची सुविधा, एलईडी फ्लॅशसह ८ एमपी ऑटोफोकस रियर व ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. फोरजी, थ्रीजी, वायफाय, ब्ल्यूटूथ सह अनेक कनेक्टिव्हीटी ऑप्शन्स आहेत. हा फोन पर्ल व्हाईट, डॉन व्हाईट व ब्लॅक कलारमध्ये उपलब्ध आहे.

जिओनी इंडियाचे जनरल मॅनेजर तिमिर बरण म्हणाले एफ सिरीजमध्ये एकाच उपकरणात डिझाईन आणि परफॉर्मन्सचा उत्तम ताळमेळ घातला गेला आहे. एफ १०३ त्याला अपवाद नाही. हा फोन पॉवरफुल व आकर्षक आहेच तसेच तो युजरची स्टाईल वाढविणाराही आहे.

Leave a Comment