सोनीने लॉन्च केला जगातील पहिला ४के डिस्प्ले आणि २३ मेगापिक्सलचा स्मार्टफोन

sony
नवी दिल्ली – एक्सपिरिया सीरीजमधील तीन नवे स्मार्टफोन सोनी कंपनीने लॉन्च केले आहेत. हे फोन आहेत एक्सपिरिया झेड५ प्रीमियम, एक्सपिरिया झेड ५ आणि एक्सपिरिया झेड ५ कॉम्पॅक्ट. कंपनीने हे तिन्ही फोन बर्लिन येथे आयोजित आयएफएच्या प्री-इव्हेंटमध्ये सादर केले. यूजर्समध्ये कंपनीच्या या फोन्सविषयी उत्सुकता शिगेला आली होती. लॉन्चिंगच्या आधीच फोनचे फीचर्स देखील लीक झाले होते.

सोनी एक्सपिरिया झेड५ सीरिजमधील तिन्ही स्मार्टफोनमध्ये दमदार कॅमेरा आहे. यावेळी कंपनीने नवा १/२.३ एक्समोर आरएस दिला आहे. २३ मेगापिक्सल सेंसरने परिपूर्ण हा कॅमेरा आहे. इतकेच नव्हे तर यात एफ२.० जी लेन्स देण्यात आले आहे. यामुळे फोटोची क्वॉलिटी सुधारते. कॅमेरा ०.०३ सेकंड ऑटोफोकससोबत येतो. मार्केटमध्ये उपस्थित असलेल्या स्मार्टफोन्समध्ये सर्वात फास्ट ऑटोफोकस असलेला स्मार्टफोन आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्‍यात आला आहे.

कंपनीने विशेष असा बदल सोनी एक्सपिरिया झेड५ सीरीजमधील फोनमध्ये केलेला नाही. झेड ५ प्रीमियमला मेटल बॉडी देण्यात आली आहे. यात ५.५ इंचाचा ४के डिस्प्ले स्क्रीन देण्यात आला आला आहे. जगातील ४के रेझोल्युशनचा हा पहिला स्मार्टफोन असून ४के डिस्प्लेमध्ये ३८४० X २१६० पिक्सल रेझोल्युशनला सपोर्ट करते.

सोनी एक्सपिरिया झेड५ ‍सीरिजमधील तिन्ही व्हेरिएंटमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसरसोबत‍ ३ जीबी रॅम आहे. एक्सपिरिया झेड५ प्रीमियम, एक्सपिरिया झेड ५ आणि एक्सपिरिया झेड ५ कॉम्पॅक्ट या तिन्ही फोनमध्ये ३२जीबीची इंटरनल मेमरी लॉन्च केली आहे. तसेच एसडी कार्डच्या मदतीने २००जीबी पर्यंत वाढवता येते. ४जी कनेक्टिव्हिटीसोबत ३जी, ब्लूटूथ, वाय-फाय आणि जीपीएस सारखे ऑप्शन त्याचप्रमाणे नियर फील्ड कम्युनिकेशन कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.एक्सपिरिया झेड५ प्रीमियममध्ये दमदार ३४३०mAh तर एक्सपिरिया झेड५ आणि एक्सपिरिया झेड५ कॉम्पॅक्टमध्ये २९००mAh पॉवरची बॅटरी देण्यात आली आहे. एक्सपिरिया झेड५ व्हाइट, ग्रेफाइट ब्लॅक, गोल्ड आणि ग्रीन कलर व्हेरिएंटमध्ये तर एक्सपिरिया झेड५ कॉम्पॅक्टला एक्स्ट्रा यलो आणि कोरल कलर व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्‍यात आले आहे.

Leave a Comment