सॅमसंगने लाँच केला सर्वात स्लिम टॅब गॅलक्सी एस२

samsung
मुंबई: आतापर्यंतचा सर्वात स्लिम गॅलक्सी टॅब एस२ सॅमसंगने भारतीय बाजारपेठेमध्ये लाँच केला असून रु. ३९,४०० एवढी या टॅबलेटची किंमत आहे.
स्लिम टॅब पैकी हा एक टॅब आहे. यांची जाडी ५.६mm आहे. याचे वजन केवळ ३९२ ग्राम आहे. हा टॅब ४जी सपोर्टिव्ह आहे. तसेच फिंगरप्रिंट सेन्सरही या टॅबमध्ये आहे.

काय खास फीचर्स आहेत सॅमसंग गॅलक्सी एस२ टॅबमध्ये : डिस्प्ले ९.७ इंचाचा आणि पिक्सल रेझ्युलेशन २०४८x१५३६ एवढे आहे. रॅम २जीबी आणि इंटरनल मेमरी ३२ जीबी, १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता. ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड ५.० लॉलिपॉपचे आहे. रिअर कॅमेरा ८ आणि फ्रंट कॅमेरा २.१ मेगापिक्सलचा आहे.

Leave a Comment