या महिन्यात येत आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहणाचा दुर्मिळ योग!

chandragrahan
वॉशिंग्टन: खगोलप्रेमींसाठी एक दुर्मिळ असे दृश्य या महिन्यात पाहायला मिळणार आहे. १९८२ नंतर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण येत असून २७ सप्टेंबरला हा दुर्मिळ योग आला आहे. दोन महत्त्वाचे दृश्य तेव्हा पाहायला मिळतील.

चंद्र जेव्हा पृथ्वीच्या अगदी जवळ येईल ते नेहमीच्या पौर्णिमेपेक्षा चंद्र तब्बल १४ पट मोठा आणि तेजस्वी दिसेल. याच मोठ्या चंद्राला जेव्हा ग्रहण लागेल म्हणजेच पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्यामध्ये येईल. तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडेल आणि हे असेल खग्रास चंद्रग्रहण. रात्री ९ वाजून ७ मिनिटांनी या ग्रहणाला सुरूवात होणार असून पूर्ण ग्रहण ११.११ वाजता लागेल. EarthSky.org नुसार हे ग्रहण अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि मध्य पूर्वेला दिसले.

Leave a Comment