मुंबई – प्रमुख रेल्वे स्टेशनांवरती काही दुरांतो एक्सप्रेस गाड्यांना व्यावसायिक थांबा मिळाला असून दुरांतो याआधीही संबंधित स्टेशनवरती तांत्रिक कामांसाठी थांबत होत्या परंतु आता त्यांना व्यावसायिक थांबा मिळाला आहे. या गाड्यांना १ जानेवारी २०१६ पासून व्यावसायिक थांबा मिळणार असून त्यासाठी गुरूवार (३ सप्टेंबर २०१५) पासून आरक्षण उपलब्ध झाले आहे.
विना थांबा ‘दुरांतो’ला मिळणार व्यावसायिक थांबा
गुरूवारपासून प्रायोगित तत्वावर या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. मात्र ऑनलाईन आणि खासगी आरक्षण केंद्रावर या गाड्यांचे आरक्षण मिळणार नाही. ऑनलाईन आरक्षण करण्यासाठी प्रवाशांना आणकी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून यासंबंधीची सूचना लवकरच प्रसिध्द केली जाणार आहे.