मेक्सिकोला चालली तळेगावची ‘शेव्हरलेट बीट’!

general-motors
पुणे – मेक्सिको बाजारपेठेसाठी पहिल्या शेव्हरलेट बीट कारची निर्मिती जनरल मोटर्स इंडियाने केली असून पुढील महिन्यात या कारची निर्यात सुरू होईल. या कारची निर्मिती तळेगाव येथील आपल्या अद्ययावत प्रकल्पात होत असून मेक्सिकोमध्ये कारची विक्री डिसेंबर २०१५ मध्ये सुरू होईल.

जनरल मोटर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरविंद सक्सेना म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाच्या आमच्या वचन बद्धतेसह, मेक्सिकन मार्केटसाठी आश्चर्यकारक शेव्हरलेट वाहनांची निर्मिती करण्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. निर्यात हा आमच्या व्यवसायाचा एक महत्त्वाचा व सतत-वाढत राहणारा भाग असेल. हा भारतास एक जागतिक निर्यात केंद्र बनविण्यासाठीच्या जनरल मोटर्सच्या धोरणाचा एक भाग आहे.

शेव्हरलेट बीट प्रामुख्याने शेव्हरलेट स्पार्क म्हणून, जगभरातील ७० हून अधिक मार्केटमध्ये उपलब्ध आहे. शेव्हरलेटने जगभरातील १ दशलक्ष पेक्षा अधिक स्पार्क्स आणि बिट्स विकल्या आहेत. जीएम इंडियाने, सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांच्या तळेगाव सुविधेमधून चिलीस वाहन निर्यात सुरुवात केली आहे. त्यांनी मागील वर्षी अंदाजे एक हजार वाहने निर्यात केली आहेत. ​​त्यांचे या वर्षी १९ हजार वाहनांची निर्यात करण्याचे लक्ष्य आहे.

4 thoughts on “मेक्सिकोला चालली तळेगावची ‘शेव्हरलेट बीट’!”

  1. Very nice to export car Chevrolet (bite)
    And new car for jurny to spine and trelbrezzer nic car only for Chevrolet

  2. Very nice to export car Chevrolet (bite)
    And new car for jurny to spine and trelbrezzer nic car only for Chevrolet

Leave a Comment