नेक्सबिटचा पहिलावहिला स्मार्टफोन रॉबिन

robin
अॅपल, गुगल आणि एचटीसी या कंपन्यांतून बाहेर पडलेल्या तज्ञांची एकत्र येऊन स्थापन केलेल्या नेक्स्टबिट या मोबाईल कंपनीने त्यांचा पहिला वहिला अँड्राईड स्मार्टफोन रॉबिन या नावाने सादर केला आहे. या फोनचे वैशिष्ठ्य म्हणजे हा फोन युजरच्या गरजेनुसार फोनची मेमरी स्वतःच वाढवून घेतो. किक स्टार्टर कॅम्पेनच्या माध्यमातून त्याची विक्री केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अनेकवेळा युजरला स्टोरेज मर्यादित असल्याचेी अडचण येते. ही अडचण नेक्सबिटने क्लाऊड स्टोरेजच्या सहाय्याने दूर केली आहे. प्रत्येक युजरला १०० जीबी खासगी स्टोरेज बॉक्स दिली जाणार आहे.यामुळे फोनची मेमरी फुल होत आली असेल तर युजरचे फोटो व अन्य डेटा आपोआपच क्लाऊड मध्ये स्टोअर केला जाणार आहे. यावेळी डिव्हाईस वायफायशी जोडलेले असेल तर डिव्हाईसच हा डेटा मूव्ह करणार आहे.

या फोनसाठी ५.२ इंची फुल एचडी स्क्रीन, फंकी प्लॅस्टीक बॉडी, ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, फिंगरप्रिंट सेन्सर, १३ एमपी प्रायमरी व ५ एमपी फ्रंट कॅमेरा,१ यूएसबी पोर्ट अशी फिचर्स दिली गेली आहेत. एलईटी, थ्रीजी, वायफाय व अन्य कनेक्टीव्हीटी ऑप्शन्स आहेत. मिंट व मिडनाईट अशा दोन कलर मध्ये हा फोन उपलब्ध आहे आणि त्याचे शिपिंग २०१६ मध्ये सुरू होणार आहे. पहिल्या १ हजार ग्राहकांना हा फोन १९८०० रूपयांत मिळेल, त्यानंतर ३० दिवसांत जे ग्राहक हा फोन घेतील त्यांना तो २३१०० रूपयांत मिळणार आहे. फोनची प्रत्यक्षातली किंमत २६४०० रूपये आहे असे जाहीर केले गेले आहे.

Leave a Comment