३८ टक्क्यांनी देशात विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

student
नवी दिल्ली – देशात विद्यार्थ्यांच्या संख्येत २००१ ते २०११ या दहा वर्षांच्या कालावधीत ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०११ मधील जनगणनेच्या आकडेवारीतून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाबाबत देशभरात जागृती झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे ज्या वयात शाळा सोडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे त्या १५ ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या संख्येत ७३ टक्क्यांनी वाढ झाली असून, मुलींच्या शिक्षणाबाबत पालक आग्रही झाले आहेत. निश्‍चितच ही बाबत देशाच्या विकासासाठी पूरक ठरणारी आहे. गत दोन दशकांमध्ये प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षणाच्यावेळी शाळा सोडणार्‍यांची संख्या अधिक होती. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये भारतात शिक्षणाविषयी मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण झाली आहे. विशेषत: सर्वसामान्य पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणाबाबत जागृत असल्याचे २०११ च्या जनगणनेतील या आकडेवारीतून स्पष्ट होत असल्याचे आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक जॉन थॉमस यांनी सांगितले.

Leave a Comment