बागान- प्राचीन मंदिरांचे शहर

myamar
म्यानमारमधील बागान हे ठिकाण प्राचीन मंदिरांचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असून एकेकाळी या ठिकाणी १० हजारांहून अधिक भव्य मंदिरे होती असे पुरावे मिळतात. ११ व्या ते १३ व्या शतकांच्या काळात ही मंदिरे बांधली गेली होती आणि ती सर्व बौद्ध मंदिरे होती.

मंडाले जवळ इरावदी नदीच्या काठी असलेल्या या शहरात ९ व्या शतकापासून ते १३ व्या शतकापर्यंत पैंगान साम्राज्य होते. त्यांच्या राजधानीचे हे शहर राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र म्हणूनही भरभराटीला आले होते. समृद्धीने नटेलेले हे शहर त्या काळी धार्मिक शिक्षणाचे मोठे केंद्र होते व तेथे शिक्षणासाठी बौद्ध भिक्कू व भारतातील विद्वानही मोठ्या संख्येने जात असत. ९ व्या शतकात सत्तेवर असलेल्या राजा अनाव्रथ याने या ठिकाणाला सत्ताकेंद्र बनविले होते. या राजाने पूर्ण बर्मा थेरबद बौद्ध संप्रदायाखाली एकत्रित आणला होता.

सुमारे १०० किमीच्या परिसरात १० हजारांहून अधिक बौद्ध मंदिरे आणि पॅगोडा पसरलेले होते. त्यातील २२०० मंदिरे आज सुस्थित आहेत मात्र बाकी मंदिरांचे अवशेष आजही पाहायला मिळतात. ही मंदिरे भूकंपामुळे नष्ट झाल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. येथील मंदिरे आणि अवशेष पाहूनच पर्यटकांना त्याकाळी हे शहर किती समृद्ध असेल याची कल्पना येते.

Leave a Comment