अॅश्ले मेडिसनवर पैसे उडविणार्‍यात मुंबईकरांची आघाडी

ashley
विवाहीत अथवा रिलेशनशीपमध्ये असलेल्या व्यक्तींना विवाहबाह्य जोडीदार शोधून देण्यास मदत करणार्‍या कॅनडातील अॅश्ले मेडिसन वेबसाईटवर खर्च करणार्‍यात भारतीयांचे प्रमाणही मोठे असून त्यात मुंबईकर आघाडीवर असल्याचे निष्पन्न झाले आहे. इंग्रजी वृत्तपत्राने या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार २००८ ते २०१५ या काळात भारतीयांनी या साईटवर सुमारे ३ कोटी रूपये खर्च केले आहेत. त्यात मुंबईकरांचा नंबर सर्वात वर आहे.

कॅनडाची ही ऑनलाईन डेटिंग सेवा २००१ मध्ये लाँच करण्यात आली व त्याचे जगभरात कोट्यावधी युजर आहेत. या साईटवर लॉगइन मोफत आहे मात्र पार्टनरसाठी मेसेज करताना पैसे भरावे लागतात. ही साईट १५ जुलै २०१५ रोजी हॅकर्सनी हॅक केली व त्यातील माहिती चोरून साईट बंद करा अन्यथा ही माहिती सार्वजनिक केली जाईल अशी धमकी दिली गेली होती. ही माहिती १८ ऑगस्टला सार्वजनिक केली गेली. या माहितीचे विश्लेषण केले गेले तेव्हा भारतात या साईटचे युजर दिल्लीत सर्वाधिक असल्याचे उघड झाले. मात्र साईटवर पैसे खर्च करणार्‍यात मुंबईचे युजर सर्वाधिक असल्याचेही दिसून आले. मोठे खर्च करणार्‍यात मुंबईचे ९३९ तर पुण्याचे ३६१ युजर असल्याचेही दिसून आले आहे. दिल्लीत युजरची संख्या ३८५६२ तर मुंबईतील युजरची संख्या ३३०३६ इतकी आहे.

Leave a Comment