धूळ करते गुप्तहेराचे काम..!

royal
न्यूयॉर्क : भरपूर काही गोष्टी घरातील धूळ जगाला सांगू शकते. घरातल्या धुळीमध्ये असलेले सूक्ष्म जीव फक्त घराचे भौगोलिक स्थानच सांगत नाहीत तर घरातील स्त्रीपुरुषांचे प्रमाणही सांगतात. एवढेच नाही तर घरातील पाळीव प्राण्यांचीही माहिती कळू शकते. नुकत्याच झालेल्या संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे.

रॉयल सोसायटीच्या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. आपल्या आजूबाजूला सूक्ष्म जीवांचे जंगलाच असते. पण हे सूक्ष्म जीव कोणते असू शकतात हे तुमच्या आजूबाजूच्या भौगोलिक आणि जैविक परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे घरातल्या धुळीतील सूक्ष्म जीवांची विविधता नोंद करण्यासाठी संशोधन करण्यात आले, अशी माहिती अमेरिकेतील कोलोरॅडो बॉऊल्डर विद्यापीठातील प्रा. नॉह फिअरर यांनी दिली आहे.

संशोधनातून तब्बल ९००० प्रकारचे सूक्ष्म जीव घरातील धुळीत असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये ५००० प्रकारचे जीवाणू, २००० प्रकारच्या बुरशी, वषाणू असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. धुळीमध्ये कोणत्या प्रकारचे सूक्ष्मजीव सापडतात त्यावरून घराच्या भौगोलिक स्थान कळू शकते. तसेच सापडणा-या जीवाणूमुळे घरातील स्त्री-पुरुषांचे प्रमाणही कळते.

Leave a Comment