सरकारच्या आर्थिक धोरणांच्या विरोधात कामगारांचा संप

strike
नवी दिल्ली : २ सप्टेंबरला विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशातील कामगारांनी देशव्यापी संप पुकारल्यामुळे देशातील व्यवहार ठप्प होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हा बंद सेंट्रल ट्रेड युनियन आणि नॅशनल फेडरेशन ऑफ एम्पॉईज या ११ राष्ट्रीय कामगार संघटनांच्या एकत्रित मंचाने पुकारला असून, कामगारविरोधी बनत चाललेल्या देशातील अर्थिक धोरणांचा यावेळी विरोध करण्यात येणार आहे. या संपामध्ये देशातील सर्व महत्त्वाच्या कामगार सहभागी होणार आहेत. त्यात बीएमएस, आयएनटीयूसी, आयटक, एचएमएस, सीटू, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ बँक या कामगार संघटनांचाही समावेश आहे. २६ मे ला या ११ संघटनांच्या झालेल्या अधिवेशनामध्ये २ सप्टेंबरच्या संपाची घोषणा करण्यात आली होती. यावेळी वाढती महागाई, रोजगारनिर्मितीची मंदावलेली गती, रेल्वे विमा आणि संरक्षण क्षेत्रात परदेशी गुंतवणूक या सरकारी धोरणांचा निषेध करण्यात येणार आहे. कामगार कायद्यांची अंमलबजावणी करावी, कामगारांना संरक्षण मिळावे, कंत्राटी पद्धत रद्द करावी, कामगार कायद्यांमध्ये भांडवलदारांच्या फायद्याचे बदल करणे थांबवावे, अशा प्रमुख मागण्या असणार आहेत.

Leave a Comment