फ्लिपकार्टचे नवे अॅप्लिकेशन लाँच

flipkart
मुंबई: आपल्या मोबाईल अॅप्लिकेशनवर ‘पिंग’ हे नवीन फीचर ई-कामर्स कंपनी फ्लिपकार्टने लाँच केले असून हे फिचर व्हॉट्सअॅप सारखेच काम करते.

आपली उत्पादने अॅपद्वारे विकण्याबाबत कंपनीचा विचार सुरु असून ही सेवा कधी सुरु होईल यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय न घेण्यात आल्यामुळे
सध्यातरी वेबसाईटच्या माध्यमातूनच उत्पादने विकण्याचा कंपनीचा इरादा आहे. सध्या भारतात ९० कोटींपेक्षा जास्त मोबईलधारक आहेत आणि ५
कोटींपेक्षा जास्त लोक आमचे अॅप्लिकेशन वापरतात. याच दृष्टिकोनातून आम्ही नव्या फीचरवर काम करत आहोत, अशी माहिती कंपनीचे मुख्य उत्पादन अधिकारी पुनित सोनी यांनी दिली आहे. मात्र इतर फॉरमॅट बंद करण्याचा कंपनीना सध्या कोणताही इरादा नाही. काही महिन्यांपूर्वीच फ्लिपकार्टने मिंत्रा ही कंपनी खरेदी केली होती आणि ती आता केवळ मोबाईल अॅपद्वारेच कंपनीच्या उत्पादनांची विक्री सुरु आहे.

आपण ‘पिंग’ या अॅप्लिकेशनमधून व्हॉट्सअॅपप्रमाणे चॅट, शेअर, कॉल, ड्रॅग अॅन्ड ड्रॉप करु शकतो आणि सध्या हे अॅप्लिकेशन सुरुवातीच्या टप्यात आहे, असेही पुनित सोनी यांनी सांगितलं.

Leave a Comment