ओबी वर्ल्डफोनचे दोन स्मार्टफोन सादर

obi-fon
जगातील नंबर वन कंपनी अॅपलचे माजी सीईओ जॉन स्कले यांनी सुरू केलेल्या ओबी वर्ल्डफोन कंपनीने दोन नवे स्मार्टफोन बाजारात सादर इकेले आहेत. एसएफ वन आणि एसजे १.५ हे दोन फोन आक्टोबरमध्ये भारत, तुर्कस्तान, पाकिस्तान, द.आफ्रिका, टांझानिया, नायजेरिया, केनिया, सौदी अरेबिया, यूएई, थायलंड, इंडोनेशिया व व्हिएतनाम या देशांत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

एसएफ वन साठी ५ इंची जेडीआय इन सेल आयपीएस फुल एचडी फ्टोटिग ग्लास डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास फोर प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. अँड्राईड लॉलीपॉप ५.०.२ ओएस, ग्राफिक्स एड्रेनो ४०५ जेपीयुची सुविधाही दिली गेली असून दोन व्हेरिएंटमध्ये हा फोन सादर केला गेला आहे.१६ जीबी व्हेरिएंटसाठी २ जीबी रॅम आहे तर ३२ जीबीसाठी ३ जीबी रॅमआहे. इंटरनल मेमरी ६४ जीबी पर्यंत कार्डच्या सहय्याने वाढविता येण्याची सुविधाही आहे. त्यांच्या किमती अनुक्रमे १३ हजार व १६५०० रूपये आहेत. या फोनसाठी १३ एमपीचा ऑटोफोकस रियर कॅमेरा व ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे.

एस जे १.५ साठी र्हंडसेट पॉलीकार्बोनेट युनी बॉडी व कर्व्ह डिस्प्ले ५ इंची स्क्रीन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास थ्री स्क्रीनसह दिला गेला आहे. ५.१ अँड्राईड लॉलीपॉप ओएस,१ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ८एमपीचा रियर व ५एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. या फोनची किंमत ८५०० रूपये आहे.

Leave a Comment