भारताकडे चीनला पछाडण्याची संधी

china
नवी दिल्ली : चीनमधील शेअरबाजार आणि चलनबाजारातील अलीकडच्या गडबडीमुळे भारत चीनला मागे टाकत जागतिक अर्थव्यवस्थेचा चालक म्हणून उभारू शकतो, असे मत विदेशी प्रसारमाध्यमांनी व्यक्त केले आहे. सर्व जगात मागणी घटत असताना ग्राहक खर्चाच्या लवचिकतेमुळे भारताला सुसंधी आहे. १२५ कोटी लोकसंख्या असणा-या भारतात कंपन्यांची होणारी वाढ आणि सरकारच्या आशादायी निर्णयांमुळे औद्योगिक क्रांती घडू शकते, असे वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात नमूद आहे.

मागील काही वर्षांपासून विकासामुळे भारतातील मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. तर चीनमध्ये केवळ उत्पादनांची निर्मिती केवळ विदेशात विक्री समोर ठेवून करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि रशियाप्रमाणे भारत या आर्थिक संकटात हादरला नाही. भारताचा विदेशी चलनाचा साठा जैसे थे असून निर्यातीद्वारे मिळणा-या विदेशी चलनावर तो अवलंबून नाही असे वृत्तपत्राने म्हटले आहे.

भारतातील मोठी लोकसंख्या वापरापेक्षा अधिक खरेदी करत आहे. यामुळे तेथे विकास केंद्रित कंपन्या आणि गुंतवणूकदार ओढले. मोठ्या प्रमाणावर आकर्षिले जात आहेत, असेही वृतपत्राने नमूद केले आहे. भारतीय अर्थव्यवस्था २०१४-१५ मध्ये ७.३ टक्कयांनी विकसित झाली आहे. तर चालू आर्थिक वर्षात ८-८.५ टक्कयांनी विकास होण्याची अपेक्षा आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीचे चित्र निर्माण झाले असताना भारत मात्र आशादायक कामगिरी करत असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार भारत २०१५-१६ मध्ये चीनला मागे टाकत जगातील सर्वात वेगाने उभरणारी अर्थव्यवस्था ठरेल. भारत चालू आर्थिक वर्षी ७.५ टक्के विकासदर गाठेल असे नाणेनिधीने म्हटले आहे. तर चीनने २०१४ च्या ७.४ टक्क्यांवरून २०१५ मध्ये ६.८ टक्के विकासदर गाठला आहे. तो चालू आर्थिक वर्षात ६.३ टक्कयांवर येईल अशी शक्यता आहे.

Leave a Comment