जगातील सर्वात लांब बोगदा यूरोपमध्ये

tunnel
बोडियो : युरोपने जगातील सर्वांत लांब आणि खोल बोगद्याचे काम पूर्ण केले आहे. गोथार्ड बेस टनल इंजिनिअरिंगचे एक अप्रतिम उदाहरण आहे. स्वित्झर्लंडची दोन शहरे अस्र्टफिल्ड आणि बोडियो यांना जोडण्यासाठी अल्पिन पर्वताला पोखरुन सुमारे ३५ मैल (५६ किमी) लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे. अल्पिन मार्गावरील वाहतूक कमी करण्यासाठी या बोगद्याची निर्मिती करण्यात आली आहे. या बोगद्यामुळे ज्युरिखपासून मिलानचे अंतर एका तासाने कमी होणार आहे. आता या प्रवासासाठी केवळ २ तास ५० मिनिटे लागतील.

Leave a Comment