हेलिकॉप्टरप्रमाणे टेकऑफ लॅडींग करणारे जेट विमान

viman
कोलरॅडोतील एक्सटीआय एअरक्राफ्ट या एरोस्पेस स्टार्टअप फर्मने ट्रायफॅन ६०० हे सहा आसनी जेट विमान तयार केले असून हे विमान हेलिकॉप्टरप्रमाणे थेट हवेत टेक ऑफ घेऊ शकते आणि हेलिपॅडइतक्या जागेत उतरूही शकते. दोन वर्षांच्या संशोधनातून या विमानाची निर्मिती झाली आहे. त्याला ३ पंखे असून ते ताशी ६४० किमीच्या वेगाने एकावेळी १३०० ते १९०० किमीचे अंतर कापू शकते. हे सहा आसनी विमान व्यावसायिक वापरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. विशेष म्हणजे प्रवाशांना विमान प्रवासासाठी विमानतळावर जाण्याची आवश्यकता नाही कारण ते कुठूनही उडू शकते व कुठेही उतरू शकते. विमानाच्या लॉचिंगची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

या कंपनीची स्थापना २००९ मध्ये केली गेली आहे. नव्या जेट व्यावसायिक विमानासाठी कंपनीने इक्विटी कँपेन सुरू केले असून त्यातून ५० दशलक्ष डॉलर्स उभारणीचे ध्येय निश्चित केले आहे. एव्हीएक्स एअरक्राफ्ट कंपनीचे माजी अध्यक्ष व सीईओ डेव्हिड ब्रॉडी या कंपनीचे प्रमुख आहेत. कंपनीने ट्रायफॅन विमानाचे पेटंटही घेतले आहे. कंपनीने सुरू केलेल्या इक्विटी क्राऊडिंग फंड मोहिमेत खासगी गुंतवणूकदार त्यातही अॅय्हीएशन मध्ये रस असलेले गुंतवणूकदार पैसे गुंतवतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. या विमानाला पहिले व्यावसायिक प्रमाणपत्रही दिले गेले आहे.

Leave a Comment