जगभरात रोबोटिक्सने क्रांती घडविली असून आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढला आहे. मात्र अद्यापी मदर रोबोने बेबी रोबो पैदा करण्याचे काम केले गेले नव्हते. म्हणजे आई मुलाला जन्म देते तसाच रोबो रोबोला जन्म देतो तसे. मात्र केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी रोबोंना हे काम करण्याचे कौशल्यही प्राप्त करून दिले आहे. येथील वैज्ञानिकांनी मदर मेकॅनाइज्ड ब्लॉक पासून बेबी रोबोची पैदास करण्यात यश मिळविले आहे. या मदर रोबोने फक्त १० मिनिटात त्यांच्या पिढीपेक्षाही सरस पुढची पिढी तयार केली आहे. विशेष म्हणजे या मदर रोबोंनी नवीन बेबी रोबो तयार केल्यानंतर त्याच्या क्षमताची चाचणी घेऊन त्यात आवश्यक ते बदलही केले आहेत.
मदर रोबोने पैदा केले बेबी रोबो
ज्या प्रमाणे सजीव आपली पुढची पिढी जन्माला घालतात त्याचप्रमाणे रोबोही आता त्यांची पुढची पिढी पैदा करू शकणार आहेत. मदर रोबो बेबी रोबो तयार करताना तिच्या पसंतीचे गुण बेबी रोबोत घालू शकते त्यामुळे रोबोची पुढची पिढी अधिक चांगली व हुशार निपजते आहे असेही समजते. यासाठी संशोधकांनी पाच विविध प्रयोग केले. त्यात रोबो आर्मप्रमाणे असलेल्या मदर रोबोने १० बेबी रोबो प्लॅस्टीक ट्यूब पासून तयार केले, त्यात मोटर बसविली गेली होती. हे रोबो मदर रोबोपेक्षा अधिक वेगवान होतेच पण त्यात माणसाप्रमाणे वेगवेगळ्या जीन्सपासून बनलेले जिनोमही होते असे समजते. पीएलओएस १ या जर्नलमध्ये हे संशोधन छापले गेले आहे.