जीसॅट-६चा पहिला कक्षा विस्तार यशस्वीरित्या पूर्ण

gsat
बंगळूरू – जीसॅट-६ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर शुक्रवारी या उपग्रहाचा पहिल्यांदा कक्षा विस्तार करण्यात आला. इस्त्रोकडून शनिवारी उपग्रहातील अपोजी मोटार ३३८५ सेकंदांसाठी सुरु करुन पहिला कक्षा विस्तार यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे सांगण्यात आले.

इस्त्रोने या उपग्रहाची निर्मिती भारतीय संरक्षण दलासाठी केली असून हा उपग्रह नऊ वर्ष कार्यरत रहाणार आहे. जीसॅट मालिकेतील हा १२ वा उपग्रह आहे. या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहामुळे संरक्षण दलांना मोठी मदत होणार आहे. श्रीहरीकोट्टा येथून जीएसएलव्ही-डी६ या प्रक्षेपकाव्दारे जीसॅट-६ चे प्रक्षेपण करण्यात आले. भारतीय शास्त्रज्ञांनी अथक मेहनत घेऊन विकसित केलेल्या स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाच्या सहाय्याने हे प्रक्षेपण करण्यात आले.

Leave a Comment