कॉन्फेडरेट मोटर्सची पी ५१ कॉम्बॅट फायटर सादर

p51
कॉन्फेडरेट मोटर्सने त्यांची सेकंड जनरेशन पी ५१ कॉम्बॅट फायटर मोटरबाईक सादर केली आहे. आजकाल अनेक कंपन्या विविध प्रकारच्या मोटरबाईक बाजारात आणत असतानाही या बाईक रायडरला जो रोमांचक अनुभव मिळेल तो अन्यत्र मिळणार नाही असा कंपनीचा दावा आहे. या मॉडेलच्या फकत ६१ मोटरबाईक बनविल्या जाणार असून त्यातील प्रत्येक युनिट युनिकच असेल असेही समजते. ग्राहकाच्या इच्छेनुसार कांही कस्टमायझेशन करून दिले जाणार आहे.

या बाईक ला २१३६ सीसी व्ही ट्विन इंजिन, फाईव्ह स्पीड ट्रान्समिशन आहे आणि सी एक्स फोर आर्किटेक्टर हे याचे युनिक फिचर आहे. यामुळे ती पहिल्यापेक्षा वजनाला हलकी पण जादा मजबूत झाली आहे. बॉडी साठी ६०६१ एरोस्पेस बिलेट अलुमिनीयम चा वापर केला गेला आहे.

या बाईकचे डिझाईन विविध प्रकारचा वेगळ्या बाईक डिझाईन करणारे पियरे हरब्लॉक यांनी केले आहे. पीयरेने भारतीय रॉयल एनफिल्ड कंपनी नुकतीच जॉईन केली आहे. पी ५१ ची ६१ युनिट दोन रंगात बनविली गेली असून त्यातील ब्लॅान्ड रंगाची ३१ बाईक ७६ लाख रूपयांना तर काळ्या रंगाच्या ३० बाईक ८० लाख रूपयांना विकल्या जाणार आहेत.

Leave a Comment