केंद्र सरकार आणणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ रुपयांचे नाणे

babsaheb
नवी दिल्ली – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला येत्या १४ एप्रिल रोजी १२५ वर्षे पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून १२५ रुपयांचे नाणे चलनात आणण्याची योजना बनवत येत आहे.

सरकारतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी १२५ रुपयांचे अभूतपूर्व नाणे चलनात आणण्यात येत आहे. मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेबांची १२५ वी जयंती केंद्र सरकारतर्फे साजरी करण्यात येणार असून केंद्रीय अर्थ आणि सामाजिक न्याय मंत्रालयात या नाण्याचे वजन आणि आकार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. तर या नाण्याच्या एका बाजूवर बाबासाहेबांचे चित्र छापण्यात येणार आहे. दरम्यान काँग्रेस आणि भाजपमध्ये या नाणे बनवण्याच्या योजनेवरुन श्रेय लाटण्यासाठी अंतर्गत वाद सुरू आहे. तर १९२० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राहत असलेले लंडन येथील घर नुकतेच महाराष्ट्र सरकारने घेतले आहे. त्याबाबती प्रकिया पुढील दोन आठवड्यांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे लंडनमधील या निवासस्थानी डॉ. बाबासाहेबांचे लंडनमधील पहिले स्मारक होणार आहे.

Leave a Comment