सिगारेट पेक्षा उदबत्तीचा धूर अधिक धोकादायक

agarbatti
आशियाई देशांत बहुतेक घरांतून तसेच मंदिर व पूजास्थळांवर धूप अथवा उदबत्ती जाळण्याची प्रथा आहे. मात्र चीनमध्ये नव्यानेच केलेल्या एका संशोधनात यातून निर्माण होणारा धूर सिगरेटच्या धुरापेक्षाही अधिक धोकादायक असल्याचे व या धुरामुळे मानवी शरीरातील पेशीत म्युटेशन होऊन कर्करोग होण्याची शक्यता वाढत असल्याचे दिसून आले आहे.

चीनमधील द चायना युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी आणि चायना टोबॅको ग्वांगडंड इंडस रेल कंपनीने संयुक्तपणे हे सर्वेक्षण व संशोधन केले आहे. त्यात सिगरेटमधून निघणारा धूर आणि उदबत्ती व धुपातून निघणारा धूर यांचा तौलनिक अभ्यास केला गेला. त्यात असे आढळले की उदबत्ती आणि धूप बनविताना जी केमिकल्स वापरली जातात, ती जळल्यानंतर त्यातून ९९ टक्के सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म कण वातावरणात पसरतात. हे कण श्वासाद्वारे आत गेल्यानंतर फुफ्पुसांना चिकटून राहतात व त्याचा परिणाम शरीरातील जिवंत पेशींवर होतो. या पेशीत बदल होऊ लागतात म्हणजेच डीएनएत बदल होतात व त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. हा धोका सिगरेटमध्ये तुलनेने कमी असतो असेही दिसून आले.

Leave a Comment