चाईल्ड पोर्न खरेदीत ‘नासा’ चे १६ कर्मचारी

nasa
वॉशिंग्टन : जगभरात प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन केंद्र अर्थात ‘नासा’ च्या काही कर्मचा-यांनी केलेल्या ऑनलाईन चाईल्ड पोर्न खरेदीमुळे चर्चेत आली असून यादरम्यान करण्यात आलेल्या एका चौकशीमध्ये नासाच्या १६ कर्मचा-यांनी चाईल्ड पोर्न खरेदी केल्याचे उघड झाले आहे. हे सर्व कर्मचारी तीन वर्षापर्यंतच्या मुलांची अश्लील छायाचित्रे आणि व्हीडीओ खरेदी करण्याच्या प्रयत्नात होते.

या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एफबीआयनुसार, या कर्मचा-यांनी २०१० मध्ये त्यांच्या वैयक्तिक क्रेडिट कार्ड आणि अन्य माध्यमांतून यासाठी आवश्यक असणारी खरेदी रक्कम भरली आहे. चौकशी करणा-या संस्थेने या व्यक्तींची नावे जाहीर केली नसून, त्यांच्याविरुद्ध कोणत्याही चौकशीचे आदेश दिलेले नाहीत. अमेरिकन नागरिकांकडून बेलारूस आणि चाईल्ड पोर्नग्राफी खरेदी प्रकरणाची चौकशी करत असताना या प्रकरणाचा खुलासा एफबीआयला झाला. २००७ मध्ये लहान मुलांच्या लैंगिक छळ प्रकरणाची ३३ हजार छायाचित्रे इंटरनेटवर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर त्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर याची चौकशी करण्यास सुरुवात झाली. एफबीआयने जवळपास ५ हजार अमेरिकन नागरिकांचा यावेळी तपास केला. यामध्ये अनेकांनी वेगवेगळ्या पोर्नोग्राफीक वेबसाईटवरून चाईल्ड पोर्नबाबत सामग्री गोळा केली होती. या पाच हजार लोकांमध्ये २६४ जण अमेरिकेच्या सुरक्षा विभागात काम केलेले होते. यामध्ये नासाच्या अनेक महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींचाही यामध्ये सहभाग आहे, असे चौकशीतून समोर आले आहे. एफबीआयने अश्लील साहित्य खरेदी करणा-या ५२ जणांविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, यामध्ये नासाच्या कर्मचा-यांचा समावेश नाही.

Leave a Comment