रसगुल्लयावरून प.बंगाल ओडिशात रस्सीखेच

rashulla
संपूर्ण भारतात आणि परदेशातही लोकप्रिय ठरलेला रसगुल्ला नक्की कोणाचा यावरचा वाद सुरू झाला असून प.बंगालने रसगुल्ला ही त्यांचीच निर्मिती असल्याचा दावा करत त्यावर भौगोलिक हक्क संपदेसाठी अर्ज करण्याचे प्रक्रिया सुरू केली आहे. २०१० मध्ये मुद्रा द्वारा आऊटलूक मासिकासाठी केलेल्या सर्वेक्षणात रसगुल्ला राष्ट्रीय मिठाई म्हणून सादर केली गेली होती. त्यावर ओडिसाने रसगुल्ला मुळचा ओडिशाचा असून त्यावर भौगोलिक स्वामित्व हक्क मिळविण्याच्या दिशेने पावले टाकली त्याला विरोध करत बंगाल या स्वामित्व हक्कासाठी प्रयत्नशील झाला असल्याचे समजते.

कोणत्याही वस्तूचे मूळ उगमस्थान स्पष्ट करण्यासाठी जेआय( जिओग्राफिकल आयडेंटिटी) म्हणजेच भौगोलिक स्वामित्व ही पद्दत वापरली जाते. अर्थात त्यासाठी पुरावे द्यावे लागतात. प.बंगाल सरकारने यासाठी ऐतिहासिक पुरावा म्हणून के.सी.दास प्रा.लिमि. या दुकानसाखळीची मदत घेतली आहे. हे दुकान १८६८ पासून सुरू आहे. या दुकानात रसगुल्ला तेव्हापासूनच बनत होता असा प.बंगाल सरकारचा दावा आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही रसगुल्ला भौगोलिक स्वामित्वासंदर्भातली कागदपत्रे लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र ओरिसाने रसगुल्ल्यावर हक्क असताना त्याची निर्मिती १२ व्या शतकातली असल्याचे पुरावे सादर केले आहेत.ओरिसा सरकारच्या म्हणण्याप्रमाणे जगन्नाथ मंदिरात रसगुल्ल्याची उत्पत्ती आहे. हे मंदिर १२ व्या शतकातले आहे आणि जेव्हा मंदिर तयार झाले आणि रथयात्रेचा शुभारंभ झाला तेव्हाच रसगुल्ला अस्तित्वात आला. तज्ञांच्या मते याचे अनेक पुरावे ऐतिहासिक दस्ताऐवजातही आहेत.

Leave a Comment