चक्क एक लिटर पेट्रोलमध्ये धावणार १०० किमी कार

tata-megapicksal

पुढील वर्षी बाजारात येणार टाटा मोटर्सची मेगापिक्सेल ?

नवी दिल्ली – लवकरच एक लिटर पेट्रोलमध्ये १०० किलोमीटर धावणारी कार देशात वाहन उत्पादन क्षेत्रात आघाडीवर असणारी टाटा मोटर्स ही कंपनी लॉन्च करणार आहे.

ही कार बाजारात टाटा मेगापिक्सलच्या रूपात येणार असून, ती दिसायला खूपच आकर्षक असणार आहे. शिवाय या कारमध्ये आधुनिक फिचर्स असतील. टाटा मोटर्सने जिनिव्हा येथे पार पडलेल्या मोटार शोमध्ये ही कार सादर केली होती. मेगापिक्सल ही टाटांची संकल्पना कार आहे आणि मध्यमवर्गीयांना समोर ठेवून या कारचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. चार आसन क्षमता असलेली ही कार पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल असेल, हे देखील सुनिश्‍चित करण्यात आले आहे. या कारमधून प्रतिकिलोमीटर फक्त २२ ग्रॅम इतके कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन होणार आहे.

याबाबत माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, टाटा मेगापिक्सल जानेवारी २०१६ मध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. ही कार लॉन्च करण्याची पूर्वतयारी सध्या कंपनीत जोमात सुरू आहे. या कारची किंमत ५ ते ६ लाख इतकी असण्याची शक्यता आहे. टाटा मेगापिक्सल कारमध्ये ३२५ सीसी सिंगल सिलेंडरचा वापर करण्यात आला आहे.

या कारमध्ये एक लिथियम आयन फॉस्फेट बॅटरी आणि धावत्या कारमध्ये रीचार्ज करण्यासाठी पेट्रोल इंजीन जनरेटर लावण्यात आले आहे. एकदा टाकी पूर्ण भरल्यानंतर ही कार एकाच वेळी ९०० किमीपर्यंत धावू शकणार आहे. कार एका लिटरमागे १०० किमी एवढे ऍव्हरेज देईल आणि ही कार ११० किमीच्या वेगाने धावण्यास सक्षम आहे.

Leave a Comment