झोपोने लाँच केला पहिलावहिला स्मार्टफोन

zopo
मुंबई: आता आणखी एका चीनी स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत पदार्पण केले असून झोपो या कंपनीने आपला झोपो स्पीड ७ हा स्मार्टफोन लाँच केला असून याची किंमत रु. १२,९९९ एवढी असून ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट स्नॅपडीलवर हा स्मार्टफोन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. झोपोने आपला नवा स्मार्टफोन भारतीय फीचर कंपनी एडकॉम सोबत मिळून लाँच केला आहे.

काय आहेत स्मार्टफोनचे फीचर्स: या फोनचा डिस्प्ले ५ इंच आणि पिक्सल रेझ्युलेशन १०८० x १९२० एवढे आहे. फोनचा प्रोसेसर अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप, ६४ बीट प्रोसेसर मीडियाटेक एमटी६७५३ ऑक्टाकोअरचे आहे. रिअर कॅमेरा १३.२ आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि १६ जीबीची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

Leave a Comment