चिनी मैझूचा एमएक्स फाईव्ह भारतात लाँच

mx5-maizu
शिओमीनंतर दोन नंबरची चिनी स्मार्टफोन कंपनी मैझूने त्यांचा एमएक्स फाईव्ह स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला आहे. चीनमध्ये हा फोन जूनमध्ये लाँच झाला होता. भारतात ई कॉमर्स कंपनी स्नॅपडील वर बुधवार दुपारपासून त्याची विक्री सुरू झाली आहे. कंपनीने या फोनची १६ ,३२, ६४ जीबी व्हेरियंट बाजारात आणली असून १६ जीबी व्हेरिएंटची किंमत १९९९९ रूपये आहे.

या स्मार्टफोनसाठी ५.५ इंची डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. ३ जीबी रॅम, अॅड्रईड लॉलीपॉप ५ .० ओएस, फिंगरप्रिट सेन्सर अशी फिचर्स आहेत. फोनला २०.५ एमपीचा प्रायमरी कॅमेरा, ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा सोनीच्या आयएमएक्स २२० एक्समोर आरएस बीएसआय सेन्सर दिला गेला असून तो ४ के रेझोल्युशनचे व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.हा फोन क्विक चार्जिंगला सपोर्ट करतो.

फोनसाठी फोरजी, एलईटी. वायफाय, ब्ल्यूटूथ, जीपीएस, एजीपीएस,ग्लोनास, मायक्रो यूएसबी कनेकटीव्हीटी ऑप्शन्स दिली गेलीआहेत.

Leave a Comment