दरवाजात कोण आलेय सांगेल हे अॅप

doorbell
दरवाजाची घंटी वाजली की दारात कुणीतरी आले हे घरातील माणसांना कळतेच. पण दरवाजा न उघडताही दारात कोण आलेय याची माहिती तुम्हाला बसल्याजागीच मिळाली तर? मग अगदी तुम्ही घरात नसलात आणि बाहेरगांवी असलात तरीही तुमच्या दरवाजात आल्यावर घंटी वाजविणार्‍याचा फोटोच दिसल तर? ही केवळ कल्पना नाही तर प्रत्यक्षात हे घडू शकते रिंग नावाच्या उपकरणाच्या सहाय्याने. या उपकरणामुळे बाहेरगावी असतानाही घराची सुरक्षा कितीतरी पटीने अधिक वाढली आहे.

यात घराची बेल स्मार्टफोनशी कनेक्ट केलेली असते त्यामुळे घराची बेल वाजली की तुम्ही नुसता फोन उचलला की दाराबाहेर असलेल्या माणसाचा फोटो तुम्हाला दिसतो. बेलजवळ कॅमेरा बसविलेला असतो आणि तो घरातील वायफायवर चालतो. दाराबाहेर कुणी आले की हा कॅमेरा त्यातील मोशन सेन्सरच्या मदतीने काम सुरू करतो व रेकॉर्डिंग करतो. त्याचवेळी फोनवर दरवाज्यात कुणी आल्याची माहिती मिळते. कॅमेर्‍यातील फोटो एचडी फॉरमॅटमध्ये रेकॉर्ड होतात. हा कॅमेरा रात्रीच्या अंधारातही फोटो घेऊ शकतो.कॅमेर्‍यातील व्हिडीओ वायफाय कनेक्ट असतोच. हे सर्व रेकॉर्डींग क्लाऊडमध्ये सेव करता येते व यामुळे तुम्ही परगांवी असलात तरीही ते तुम्ही पाहू शकता.

सुटीवर जाताना घराची काळजी या उपकरणामुळे खूपच कमी झाल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment