बंधन बँकेचे 501 शाखांसह दिमाखात उद्घाटन

bandhan
कोलकाता – बंधन बँकेचे 501 शाखांसह पूर्ण बँक म्हणून काम सुरू झाले असून याचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते कोलकाता सायन्स सिटी ऑडिटोरियममध्ये रविवारी करण्यात आले. अंदाजे 2 हजार अब्ज डॉलर्सच्या बँकींग उद्योगला बंधन बॅकेंच्या रूपाने नवा सदस्य मिळाला असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या 24 राज्यात 501 शाखा, 2022 सेवा केंद्रे, 50 एटीएम,1 कोटी 43 लाख खातेदार, 19500 कर्मचारी असा या बॅकेंचा पसारा आहे. बँकेने आत्तापयर्ंंत 10500 कोटी रूपयांचे कर्जवाटपही केले आहे.

बँकेचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक व सीईओ चंद्रशेखर घोष म्हणाले की आम्ही आमचा कार्यविस्तार लवकरच करत आहोत. वर्षअखेर 27 राज्यात 632 शाखा व 250 एटीएम असे आमचे लक्ष्य आहे. आमच्या बॅकेंच्या 71 टक्के शाखा ग्रामीण भागात व त्यातही 35 टक्के शाखा जेथे आजपर्यंत बॅकेंची सुविधा नाही अशा ग्रामीण भागात उघडल्या गेल्या आहेत. प.बंगालमध्ये बँकेच्या सर्वाधिक 220 शाखा आहेत. महाराष्ट्रात 21 शाखा आहेत. बोस म्हणाले आमच्यासाठी ग्राहक हे पहिले प्राधान्य असून त्यात लहान मोठा भेद नाही. बॅकींग क्षेत्रात नवीन युग आणण्याची आमची मनीषा आहे. कमी उत्पन्न गटातील महिला,स्वसहाय्यता समूह, छोटे उद्योजक व व्यायसायिक यांना मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

Leave a Comment