फेरारीच्या कॅलिफोर्निया टी ची भारतात विक्री 26 ऑगस्टापासून

ferrari
फेरारीच्या आत्तापर्यंतच्या मॉडेल्सपैकी सर्वात स्वस्त अशी जाहिरात झालेली कॅलिफोर्निया टी ही कार 26 ऑगस्टला मुंबईत विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. या गाडीची मुंबईतील एक्सशो रूम किंमत आहे 3 कोटी 30 लाख रूपये.

मुंबईतील नवनीत मोटर्स या नव्या डिलरबरोबर फेरारीने त्यासाठी सहकार्य करार केला आहे. फेरारीचे भारतातले हे पहिले अधिकृत लाँच आहे. यापूर्वीचे फेरारीचे भारतातील कार विक्रीचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. मात्र ही नवी स्वस्त कार भारतात कंपनीला पाया घालून देईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. ही कन्व्हर्टिबल कार आहे आणि व्ही आठ इंजिन फ्र ंटला असलेली पहिलीच कार आहे. कारचे अ‍ॅव्हरेज 1 लिटरला 9 किमी आहे आणि 0 ते 100 पर्यंतचा वेग घेण्यासाठी तिला 3.6 सेकंद लागतात. कारचा टॉप स्पीड आहे 315 किमी.

या कारला बूट स्पेस चांगली दिली गेली आहे त्याचबरोबर सामान नेण्यासाठी जादा जागाही दिली गेली आहे. ही कार टर्बोचार्ज्ड आहे.

Leave a Comment