‘ओप्पो’ने आणला सर्वात स्लीम आर५एस

r5s
मुंबई : सुपर-स्लिम स्मार्टफोन आर५ चे अपग्रेडेड वेरिअंट आर५एस ‘ओप्पो’ने लाँच केला असून ओप्पो आर५एस हा कंपनीच्या वेबसाईटवर सुमारे १५हजार रुपयांमध्ये २५ ऑगस्टला विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

या फोनची खासियत अशी आहे की, यात ३ जीबीचे रॅम असून यात ३२ जीबी एवढे इंटर्नल स्टोरेज आहे. या फोनची स्क्रीन ५.२ इंचाची असून १०८० पिक्सेल्सचे रेझोल्यूशन आहे. ऑपरेटिंग सिस्टम ओएस अँड्रॉईड ४.४ बेस असून प्रोसेसर १.५GHz चा ऑक्टाकोअर कॉर्टेक्स-ए५३चा प्रोसेसर आहे. याचा रेअर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आणि ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅम असून यामुळे एचडी क्वॉलिटीचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही शक्य आहे.

हँडसेटची फ्रेम ३डी वेल्डेड अॅल्युमिनियम अलॉय मटेरिअलपासून बनवण्यात आली आहे. फोनचे चार्जिंग ही सर्वांसाठी चिंतेची बाब असते. म्हणूनच
ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये रॅपिड चार्ज टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. एका विशेष लिक्वीड मेटलने तयार केलेले कूलिंग एलिमेंट फोनमधील उष्णता आटोक्यात ठेवण्यास मदत करते.

Leave a Comment