एड्सचा विषाणू १.६ कोटी वर्षांपूर्वीचा; बोस्टन महाविद्यालयाचे संशोधन !

aids
वॉशिंग्टन : आफ्रिकेतील नर वानरांमध्ये १.६० कोटी वर्षांपासून ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणजे एड्स विषाणूशी संबंधित असलेले लेंटिव्हायरसेस (सतत रचना बदलणारे विषाणू) हे अस्तित्वात होते असे नवीन अभ्यासात निष्पन्न झाले असून अमेरिकेतील बोस्टन महाविद्यालयाचे वेलकिन जॉन्सन व त्यांच्या सहका-यांनी अंतर्गत रचना सतत बदलणा-या लेंटिव्हायरसेस (रेटट्रोव्हायरसेसचा एक प्रकार) या विषाणूंचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

नर वानरांमध्ये हे विषाणू अस्तित्वात होते. विशेष म्हणजे टिड्ढम ५ हे जनुक या विषाणूच्या विरोधात काम करीत असते व ते या विषाणूंपासून पेशींचे रक्षण करीत असते. टिड्ढम ५ जनुक लेंटीव्हायरस या विषाणूच्या पृष्ठभागावर असलेल्या कणांच्या सान्निध्यात येते व त्या विषाणूंची संख्या वाढण्यास प्रतिबंध करते. टिड्ढम ५ या जनुकाची आवृत्ती वानरांमध्ये असते तशी ती माणसांमध्येही असते, पण अनेक वानरांमध्ये हे जनुक एचआयव्ही विषाणूंना निरुपद्रवी करून टाकते. रेटड्ढोव्हायरसेस म्हणजे रचना सतत बदलणा-या एचआयव्ही विषाणूंना रोखण्यासाठी ट्रीम ५ या जनुकात कालांतराने आफ्रिकी वानरांमध्ये सतत बदल होत गेले.ट्रीम ५ या जनुकाच्या उत्क्रांतीचे टप्पे उलगडण्यात आले असून त्यासाठी आफ्रिकेतील २२ वानर प्रजातींची डीएनए क्रमवारी उलगडण्यात आली आहे.

आताचे जे सिमियन इम्यनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणजे एसआयएम विषाणू आहेत. त्यांच्याची संबंध असलेले विषाणू आफ्रिकेतील वानरांमध्ये १.१ ते १.६ कोटी वर्षांपासून अस्तित्वात होते. मॅकॉक, मँगबेज व बबून या माकडांच्या प्रजातींमध्ये लेंटिव्हायरसेसना ट्रीम ५ जनुके प्रतिकार करतात पण इतर प्रकारच्या रेटट्रोव्हायरसेसमध्ये हे जनुक फार प्रतिकार करू शकत नाही. सेरकोपिथेसिनाय हा आफ्रिकी वानरांचा उपप्रकार आहे. त्यात एड्सचे हे विषाणू प्रत्येक देश व खंडानुसार रचना बदलत असल्याने हा रोग उपचार करण्यास अवघड आहे, त्यामुळेच रेटट्रोव्हायरसेस सतत अंतर्गत रचना बदलत असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment