उबंटू ओएसचे दोन स्मार्टफोन भारतात दाखल

ubantu
स्पॅनिश मोबाईल फोन कंपनी बीक्यूने अ‍ॅक्वारिस 4.5 व अ‍ॅक्वारिस 5 हे उबंटू ऑपरेटिंग सिस्टीमचे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरविले आहेत. हे दोन्ही फोन या महिना अखेरी स्नॅपडीलवर मिळू शकणार आहेत. त्यांच्या किंमती अनुक्रमे 11999 व 13499 रूपये अशा आहेत.

हे दोन्ही स्मार्टफोन ड्युल सिम व क्विक स्टार्ट स्क्रीनसह आहेत. अ‍ॅक्वारिस 4.5 मध्ये 4.5 इंची क्यूएचडी आयपीएस डिस्प्ले ड्रँगन ट्रायल प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. 1 जीबी रॅम व 8 जीबी इंटरनल मेमरी, 32 पर्यंत वाढविण्याची सुविधा यात दिली गेली आहे. अ‍ॅक्वारिस 5 साठी 5 इंची एचडी आयपीएस डिस्प्ले ड्रॅगन ट्रायल प्रोटेक्शन सह दिला गेला आहे. 1 जीबी रॅम,16 जीबी इंटरनल मेमरी 32 पर्यंत वाढविण्याची सुविधा यात आहे. दोन्ही फोनसाठी 13 एमपीचा रियर व 5 एमपीचा फ्रंट कॅ मेरा व टूजी, थ्रीजी, वायफाय, ब्ल्यू टूथ कनेक्टीव्हीटी ऑप्शन्स आहेत.

Leave a Comment