आसूसने आणला २५६ जीबी मेमरीचा स्मार्टफोन

asus
मुंबई: भारतीय बाजारपेठेत नुकतेच आसूस मोबाइल फोन कंपनीने आपले तीन स्मार्टफोन लाँच केले असून यामध्ये जेनफोन २ डीलक्स, झेनफोन २ लेजर आणि जेनफोन सेल्फी यांचा समावेश आहे. कंपनीने काल आसूस झेनफोन २ डीलक्सचे स्पेशल एडिशन लाँच केले असून या स्मार्टफोनमध्ये तब्बल २५६ जीबी इंटरनल मेमरी स्टोरेज देण्यात आली आहे.

ब्राझिलमध्ये या एडिशनचे लाँचिंग करण्यात आले. जेनफोन २ डीलक्सचे स्पेशल एडिशनमध्ये १२८ जीबीपर्यंत मेमरी कार्ड सपोर्ट करते. या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेतील किंमत रु. २२,९९९ एवढी आहे.

Leave a Comment