सोनेजवाहिरांसह गायब झालेली नाझी रेल्वे सापडली

nazi
दुसर्‍या महायुद्धाच्या काळात लुटीच्या सोनेजवाहिरांनी भरलेली मात्र अचानक गायब झालेली नाझी रेल्वे सापडल्याचा दावा दोन खजिना शोधकर्त्यांनी केला आहे. ही रेल्वे पोलंडमध्ये सापडल्याचे सांगितले जात असून तिचा शोध घेणार्‍यांतील एक पोलंडचा तर दुसरा जर्मनीचा नागरिक आहे. या ट्रेनमध्ये ३०० टन सोन्यासह अनेक मौल्यवान रत्ने आहेत असेही सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १९४५ साली पूर्व जर्मनीतील व्रॉत्स्लाफ मध्ये रशियन सेनेने चढविलेल्या हल्ल्याच्या वेळी ही रेल्वे अचानक गायब झाली होती.दक्षिण पश्चिम पोलंडमधील एका लॉ फर्मने दोन व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधून या रेल्वेचा शोध लागल्याची माहिती दिल्याचे सांगितले आहे. ही रेल्वे एखाद्या भुयारात घुसली असावी आणि भुयार बंद केले गेल्यामुळे गायब झाली असावी असा अंदाज वर्तविला जात होता. १५० मीटर लांबीच्या या रेल्वेत ३०० टन सोने आहे. नाझींनी केलेली लूट याच रेल्वेतून बर्लिन येथे नेली जात असे. सैनिक, पोलिस आणि अग्नीशमन दलाचे कर्मचारी या प्रकरणी शोध घेत असून ज्या व्यक्तींनी रेल्वे सापडल्याचा दावा केला आहे, त्यांनी रेल्वेतील एकूण मालाच्या किमतीच्या १० टक्के हिस्सा मागितला असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment