सापुतारा – प्रेमात पाडणारे हिलस्टेशन

saputara
सह्याद्री पर्वतरांगात लपलेले गुजराथेतील एकमेव हिलस्टेशन सापुतारा कुणाही निसर्गप्रेमीला प्रेमात पाडेल असे सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे. चारी बाजूंनी घनदाट जंगल, विपुल सरोवरे, नयनरम्य पर्वतरांगाचे वैभव मिरविणारे हे ठिकाण पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. बाराही महिने अतिशय आल्हाददायक हवामान हे याचे आणखी एक वैशिष्ठ्य.

महाराष्ट्र आणि गुजराथच्या सीमेवर वसलेल्या सापुतारावर निसर्गाने सौंदर्याची लयलूट केली आहे. येथील सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्हीही पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतात. देशातील सर्वात लांब म्हणजे १ किमी लांबीचा रोपवे आसपासच्या निसर्गाचे डोळे भरून दर्शन घडवितो तर सुंदर सरोवरांतून नौकानयनाचा आनंदही मनमुराद लुटता येतो. सुंदर धबधबा या निसर्गसौंदर्यात चार चाँद लावतो.

२४ किमीच्या परिसरात पसरलेले वसंदा नॅशनल पार्क वन्यप्राणी दर्शनाची संधी देते. येथे वाघ, चित्ते, तरस, बारशिंगे असे अनेक वन्य प्राणी दर्शन देतात मात्र नॅशनल पार्कमध्ये जाण्यापूर्वी वन विभागाची परवानगी घ्यावी लागते. चार आठ दिवस अगदी शांततेत घालविण्यासाठी हे पर्यटन स्थळ आदर्श आहे. महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातून येथे रस्तामार्गाने जाता येते. मुंबईपासून विमानसेवा आहे. गुजराथ सरकारकडूनही येथे येण्यासाठीची व्यवस्था केली गेली आहे. निवास आणि जेवणाखाणाची उत्तम सोय आहे.

Leave a Comment