ब्लॅकबेरी अड्राईड स्लायडर फोनचे फोटो लिक

blackberry
ब्लॅकबेरीने त्यांच्या पहिल्यावहिल्या अँड्राईड स्लायडर स्मार्टफोन व्हेनिसवर काम सुरू केले असल्याचे इवान ब्लासने ट्विट केले असून या स्मार्टफोनचे फोटोही लिक झाले आहेत. फोटोनुसार मोठ्या स्क्रीनच्या या फोनमध्ये स्लायडरखाली फिजिकल कीबोर्ड दिसत आहे. तसेच प्लेस्टोर, गुगल प्लस, हँगआऊट, गुगल मॅप्ससारखे गुगल अॅप्सचे लोगोही दिसत आहेत.

माहितीनुसार हा फोन अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये सादर केला जाईल आणि एटी अॅन्ड टी, व्हेटिकन, टी मोबाईल्स व स्प्रिंट या चार राष्ट्रीय टेलिकॉम ऑपरेटिंग कंपन्यांतर्फे तो सादर होईल. यापूर्वी तो फक्त एटी अॅन्ड टी तर्फेच सादर केला जाईल असे सांगितले जात होते. या फोनसाठी ड्युअल एज कर्व्हड डिस्प्ले.५.४ इंची स्क्रीन,३ जीबी रॅम, १८ एम.पी.चा रियर तर ५ एम.पी.चा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. एखादी गोष्ट जलद नोट करण्यासाठी ऑन स्क्रीन कीबोर्डही दिला गेला आहे. फिजिकल की बोर्डचा वापर ईमेल सारख्या हेवी युजसाठी करता येणार आहे.

Leave a Comment