जगातील सर्वात श्रीमंत तरुण ठरला मार्क झुगेरबर्ग

mark
न्यूयॉर्क – जगातील सर्वात श्रीमंत तरुण म्हणून फेसबुकचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुगेरबर्ग हे ठरले असून ३५ पेक्षाही कमी वय असलेले झुगेरबर्ग यांची स्वत:ची संपत्ती ४१.६ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

ही माहिती ‘वेल्थ-एक्स’च्या अहवालातून प्रसिद्ध करण्यात आली. फेसबुकचे आणखी एक सहसंस्थापक दस्तीन मोस्कोव्हीत्झ यांनीही व्यक्तिगत धनाढ्यांच्या यादीत स्थान मिळविले आहे. ९.३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते यादीत दुसर्‍या स्थानावर असून, फेसबुकचेच एडुर्डो सॅव्हेरिन हे ५.३ अब्ज डॉलर्स संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत.

विशेष म्हणजे, यादीतील ‘टॉप-२०’मध्ये सहा महिलांना स्थान मिळाले आहे. चीनमधील कंट्री गार्डन होल्डिंग या रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या ३४ वर्षीय ह्युयान यांग सर्वात श्रीमंत महिला ठरल्या असून, ५.९ अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीसह यादीत त्यांना तिसरे स्थान मिळाले आहे. ३५ वर्षे वयोगटातील ‘टॉप टेन’ धनाढ्यांमध्ये स्कॉट डंकन ५ अब्ज डॉलर्ससह यादीत पाचव्या स्थानावर असून, एलिझाबेथ हॉल्म्‌स ४.५ अब्ज डॉलर्ससह सहाव्या स्थानावर आहेत.

Leave a Comment