कांद्याची घोडदौड शंभरीकडे

onion
शतकी दराकडे कांद्याची वाटचाल सुरू झाली असल्याने सध्या ८० रूपयांच्या घरात असलेला कांदा खरेदीसाठीही ग्राहक उतावळे बनले असल्याचे चित्र राजधानी दिल्लीसह देशाच्या बहुतेक सर्व राज्यांतून दिसू लागले आहे. दिल्लीत तर कांदा खरेदीसाठी भाजी दुकानातून रांगा लागल्याचे दृष्य दिसते आहे.

कांद्याची देशातील मोठी बाजारपेठ असलेल्या महाराष्ट्रातील लासलगांव येथेही कांदा ५४ रूपये किलोवर पोहोचला आहे. हा दर आत्तापर्यंतचा सर्वाधिक आहे. यंदा कांद्याच्या खरीप उत्पादनात घट येण्याचा अंदाज वर्तविला जात असून कांद्याची नवीन आवक होण्यासाठीही अजून कांही काळ वाट पाहावी लागणार आहे. परिणामी बाजारात कांद्याचा पुरवठा कमी होत असल्याचे दरवाढीवर नियंत्रण आणणे अवघड झाले आहे. महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक व आंध्र या कांदा पीक उत्पादन करणार्‍या प्रमुख राज्यांत यंदा पावसाने चांगलीच ओढ दिल्याने कांदा लागवड उशीरा झाली आहे त्यामुळे पीक हातात येण्यासही उशीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment