विक्रीसाठी उपलब्ध झाला मायक्रोमॅक्सचा कॅन्वास टॅब

micromax
नवी दिल्ली- २२ ऑगस्टपासून मायक्रोमॅक्सचा कॅन्वास टॅब पी ६८० हा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

हा टॅब दिसायला अत्यंत आकर्षक असून टॅबची इंटरनल स्टोरेज १६ जीबी आहे तर ३२ जीबी पर्यंत एक्सपांडेबल आहे. या टॅबची ऑपरेटिंग सिस्टम ही अद्ययावत अॅंड्रॉइड ५.० लॉलीपॉप आहे. रिअर कॅमेरा ५ मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा २ मेगा पिक्सल आहे. या फोनची बॅटरी पावरफुल असून ती ४,००० एमएएच ही आहे. ३ जी, ब्लू टूथ आणि वाय फाय कनेक्टिविटीने हा टॅब सज्ज आहे. बेस्ट ऑडिओ आणि व्हिडिओ एक्सपेरियन्ससाठी हा टॅब अत्यंत योग्य आहे असे कंपनीचे सीईओ विनीत जैन यांनी म्हटले आहे.