वावेचा रोटेटिंग कॅमेरावाला नवा ऑनर फोन

vave
चीनच्या हुवाईची स्मार्टफोनमेकर कंपनी वावेने फिरणार्‍या कॅमेर्‍यासह नवा ऑनर सेव्हन आय स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन फक्त चीनमध्येच लाँच केला गेला आहे. या फोनमध्यें सेल्फी घेण्यासाठी बॅक कॅमेरा रोटेट करून तो फ्रंट कॅमेरा म्हणून वापरता येतो. तसेच याला उजवीकडे फिंगरप्रिंट सेन्सरही दिला गेला असून त्याचा उपयोग हँडसेट अनलॉक करण्यासाठी तसेच फोटो किलक करण्यासाठी होणार आहे. जगातील हा सर्वात पहिला छोटा फिंगरप्रिंट सेन्सर असल्याचा कंपनीचा दावा आहे.

ऑनर सेव्हन आय साठी ५.२ इंची फुल एचडी स्क्रीन, अँड्राईड ५.० लॉलीपॉप ओएस. १६ जीबी व्हर्जनसाठी २ जीबी रॅम तर ३२ जीबी व्हर्जनसाठी ३ जीबी रॅम दिली गेली आहे. यात कॅमेरा मॉड्यूल बाहेर ओढता येते व फ्रंट कॅमेर्‍याप्रमाणे त्याचा वापर करता येतो. फोनला सोनीचा १३ एमपी कॅमेरा बीएसआय सेन्सर व एफ २.० लेन्ससह व ड्युअल एलईडी फ्लॅशसह दिला गेला आहे. टूजी,थीजी, फोरजी, वायफाय, ब्ल्यू टूथ, मायक्रो यूएसबी अशी कनेक्टीव्हीटी ऑप्शन्स आहेत.

Leave a Comment