गुगलपेक्षाही कार्यक्षम माझे सर्च इंजिन, किशोरवयीन अनमोलचा दावा

tukrel
बंगळुरू – गुगलच्या सीईओपदी असलेल्या एक भारतीयाला एका भारतीयानेच आव्हानही दिले असून आपण तयार केलेले सर्च इंजिन हे गुगलपेक्षाही अधिक कार्यक्षम असल्याचा दावा कॅनडात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या अनमोल टकरेलने केला आहे.

गुगलपेक्षा ४७ टक्के अधिक चांगल्याप्रकारे पर्सनलाइज्ड सर्च अनमोलने तयार केलेल्या सर्च इंजिनद्वारे होते असे त्याचे म्हणणे आहे. अनमोल हा दहावीत शिकतो. हे सर्च इंजिन बनविण्यासाठी त्याला ६० घंटे कोडिंग करावे लागले. त्याने हे इंजिन गुगल सायन्स फेअर या स्पर्धेमध्ये सादर केले. ही स्पर्धा १३ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी होती. गुगलही पर्सनलाइज्ड सर्चची सेवा पुरविते तेव्हा आपल्याला त्याच्या एक पाऊल पुढे जायचे आहे असे त्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते.

Leave a Comment