अजबनगरी दुबई

dubai
जगभरातील विविध राज्यांत, देशात आपापले कायदे कानून पाळले जातात. मात्र अनेकदा हे कायदे अजब असतात आणि तरीही ते पाळणे नागरिकांना बंधनकारक असते अन्यथा शिक्षा भोगावी लागते. पर्यटकांचे आवडते डेस्टीनेशन असलेल्या संयुक्त अरब अमिरातीतील एक देश दुबई हाही अशाच अजब नियमांचा देश आहे.

अतिभव्य इमारती आणि नाईटलाईफ साठी पर्यटकांची दुबईत सतत गर्दी असते. मात्र अनेकांना हे माहिती नाही की येथे अॅड्रेस सिस्टीम अस्तित्वातच नाही. म्हणजे तुम्हाला एखादे ठिकाण शोधायचे असेल तर जवळपासची खूण सांगावी लागते कारण संबंधित स्थळाला अधिकृत असा पत्ता नसतो. म्हणजे घर नंबर अमूक, अमुक पेठ, अमूक रस्ता असा पत्ता सांगून येथे सांगता येत नाही तर जवळपासचे हॉटेल अथवा अन्य मोठी खूण सांगावी लागते. तरीही जगभरात गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत असतानाही दुबईत गुन्ह्ये घडत नाहीत. याला कारण म्हणजे गुन्हेगारांना येथे दिल्या जाणार्‍या कडक शिक्षा हे आहे.

दुबईत विवाहाअगोदर शरीरसंबंध ठेवण्यास परवानगी नाही. सार्वजनिक ठिकाणी विवाहाअगोदर जोडप्याला हातात हात गुंफण्यासही परवागनी नाही. नियम मोडणार्‍यास तुरूंगवासाची शिक्षा होते. दुबई हे जगातील सर्वात सुरक्षित शहर आहे. विशेष म्हणजे येथील लोकसंख्येत फक्त १७ टक्के लोक मूळचे दुबईचे आहेत. बाकीत ५० टक्के भारतीय व ३३ टक्के अन्यदेशीय आहेत. आयकराच्या ओझ्याखाली जगभरातील नागरिक गुदमरत असताना दुबईत मात्र आयकर नाही.

दुबईत सध्या इतक्या प्रचंड प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत की जगातील एकूण क्रेनमधल्या २० टक्के क्रेन दुबईत आहेत. जगातील सर्वात मोठ्या लांबीची सोन्याची साखळी येथेच बनविली गेली. ४.२ किमी लांबीची ही साखळी २२ किलो वजनाची आहे आणि ९६०० लोकांनी मिळून ती खरेदीही केली आहे.

Leave a Comment