वॉशिंग्टन: संशोधकांनी प्रयोगशाळेत चक्क मानवी मेंदू तयार करण्यात यश मिळवले असून पाच आठवड्याच्या मानवी गर्भाच्या मेंदूइतका हा मेंदू विकसित असल्याचा दावा ओहिओ स्टेट विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे. संशोधकांच्या या गटात भारतीय वंशाच्या एका संशोधकाचाही समावेश आहे. या मेंदूचा आकार खोडरबर एवढा असून त्यात मानवी अर्भकाच्या मेंदूत असणारी ९९ टक्के गुणसूत्रे आहेत. मानवी त्वचेच्या पेशींपासून विकसित करण्यात आलेले मेंदूचे हे आजवरचे सर्वाधिक परिपूर्ण मॉडेल आहे, अशी माहिती ओहिओ स्टेट विद्यापीठातील जैवरसायनशास्त्र आणि औषधशास्त्राचे प्राध्यापक रेने आनंद यांनी दिली. या मॉडेलमुळे प्रायोगिक अवस्थेतील अनेक औषधांच्या प्रत्यक्ष चाचण्या शक्य होणार आहेत.