भेटीत मिळाली बायको

hauldi
नेते, बडे अधिकारी यांना खुष राखण्यासाठी महागड्या भेटी देण्याची प्रथा जगभर आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे अधिकार्‍याला चक्क बायको भेट म्हणून मिळाल्याचा अजब मामला समोर आला आहे. साऊथ आफ्रिका ब्रॉडकास्टींग कार्पोरेशनचे कार्यकारी अधिकारी हलौदी मोत्साएनेंग यांना ही भेट मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक आदिवासींच्या एका गटप्रमुखाने हलौदी यांना बायको आणि गाय वासरू भेट म्हणून दिले. या प्रमुखाने १० मुलींची रांगच हलौदी याच्यासमोर उभी केली आणि तुला आवडेल ती मुलगी निवड असे सांगितले. हलौदीने २२ वर्षांची मुलगी पसंत केली. ही मुलगी ह्मूमन रिसोर्स मॅनेजमेंटची विद्यार्थीनी आहे. भेटीची ही बातमी फुटली मात्र तेथील महिला संघटनांनी त्याविरोधात कडक निषेध नोंदविला आणि आंदोलन छेडले. लिंपोपो प्रांतात घडलेल्या या घटनेच्या तपासाचे आदेश दिले गेले असल्याचे समजते.

Leave a Comment