मायक्रोमॅक्सने आणला आकर्षक फीचर्ससह ४३ इंचाचा LED टीव्ही

micromax
मुंबई : एक नवा एलईडी टीव्ही मायक्रोमॅक्सने लॉन्च केला असून मायक्रोमॅक्स 43B6000MHD या कोडनेमने लॉन्च केलेला हा टीव्ही खास मध्यम बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी असून पेटीएमवर हा टीव्ही ३१ हजार २९९ रुपयांना उपलब्ध आहे. सुरुवातीला कंपनीने या टीव्हीची किंमत ४३ हजार ९९० रुपये जाहीर केली होती, पण सध्या २९ टक्के डिस्काऊंटने ३१ हजार २९९ रुपयांनी विक्री होत आहे.

फीचर्स : मोबाईल हाय-डेफिनिशन (MHL), ब्लूटूथ, मोबाईल कंटेट एचडी क्वालिटीमध्ये पाहता येणार, संपूर्ण एचडी (1920×1080 पिक्सेल रिझॉल्युशन), स्मार्टफोनवरील कंटेट टीव्हीवर पाहणे शक्य त्याचबरोबर यासोबत, १० वॅट्सचे दोन ऑडिओ स्पिकर, ५ बँड्स इक्विलाईजर आणि ऑटो व्हॅल्युम लेव्हलरही या टीव्हीला आहे. २ HDMI पोर्ट्स, २ USB पोर्ट्सची कनेक्टिव्हीटीही असेल.

Leave a Comment