आयबेरीचा फिंगरप्रिंट सेन्सरसहचा ऑक्सस प्राईम सादर

auxus
हाँगकाँगची स्मार्टफोनमेकर कंपनी आयबेरीने भारतात फिंगरपिंट सेन्सर तंत्रज्ञान असलेला ऑक्सस प्राईम पी ८००० स्मार्टफोन सादर केला असून हे तंत्रज्ञान असलेला भारतीय बाजारातील हा सर्वात स्वस्त फोन आहे. हा फोन १४९०० रूपयात या महिन्यात स्नॅपडीलवर विक्रीसाठी उपलब्ध केला जात आहे.

ऑक्सस प्राईम पी ८००० साठी गुरील्ला ग्लास प्रोटेक्शनसह ५.५ इंची फुल एचडी डिस्प्ले, अँड्राईड ५.१ लॉलिपॉप ओएस, ३ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ३६० डिग्री टच आयडी तसेच एलईडी फ्लॅशसह १३ एमपीचा रिअर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. फोनची बॅटरी बदलता येत नाही. मात्र ती जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी आहे.

Leave a Comment